कर्नाटक विधानसभा निवडणूक; सट्टे बाजाराचा कौल भाजपला

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी १२ मेला मतदान झाले . काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलय. आम्हीचं बाजी मारणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय.

दरम्यान जरी असं असलं तरी सट्टाबाजाराने मात्र भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची अवस्था त्रिशंकू होणार आहे. मात्र दुसरीकडे सट्टे बुकींनी कर्नाटकमध्ये कमळ फुलणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

सट्टाबाजारात सुरू असलेल्या हालचालीनुसार कर्नाटकमध्ये कमळ फुलण्याची चिन्हे आहेत. सट्टाबाजारात भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार बोली लागली असल्याचं वृत्त आहे. सट्टा बाजारातील बुकींच्या अंदाजानुसार भाजपला ९६ ते ९८ जागा मिळतील. तर, सत्ताधारी काँग्रेसला ८५ ते ८७ जागांवर समाधान मानावे लागेल.