Share

Riteish Deshmukh । रितेश देशमुख आणि जेनेलियाला 15 दिवसांत भूखंड कसा दिला? ; कारखाना आणि लातूर MIDC अडचणीत

(Riteish Deshmukh) लातुर : भाजपने बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लातूरमधील इतर उद्योजकांना डावलून अवघ्या कमी कालावधीत देशमुखांना भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावरून लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेने त्यांना ११६ कोटींचा पुरवठा काही दिवसांतच कसा काय दिला? असा सवाल करण्यात येत आहे.

रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांचा एक कारखाना सुरु होण्याआधीच चर्चेत आला आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप करत भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. MIDC मध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोक वेटिंगलिस्टवर आहेत. आधीपासूनच यांनी अर्ज दिले आहेत. असे असताना रितेश देशमुख यांनाच तातडीने भूखंड उपलब्ध करुन दिल्याचा गुरुनाथ मगे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत मगे यांनी हे आरोप केले आहेत.

भाजपने केलेल्या आरोपांमुळे लातूर MIDC प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में. देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरू करायचा आहे. हा कारखाना सुरू होण्याआधीच तो वादात सापडला आहे. एमआयडीसीमध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोकांनी अर्ज दिले आहेत. असे असताना रितेश देशमुख यांनाच लगेच भूखंड उपलब्ध करूनन दिल्याचा आरोप गुरुनाथ मगे यांनी केला आहे.

देशमुख यांना एका महिन्यात १२० कोटींचे कर्ज कसे देण्यात आले? कमी कालावधीत त्यांना कर्ज कसे मिळाले? त्या बँकेने आतापर्यंत किती जणांना कर्ज दिले? याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे. रितेश आणि जेनेलिया यांना एमआयडीसीमध्ये कोणत्या निकषांच्या आधारे जमीन देण्यात आली आहे? असा प्रश्नही भाजप विचारत आहे. भाजपने केलेल्या आरोपांमुळे लातूर एमआयडीसी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर रितेश आणि जेनेलिया यांची प्रतिक्रिया काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

(Riteish Deshmukh) लातुर : भाजपने बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्यावर गंभीर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now