अरे चंद्रकांत दादा किती वेळा चुकताय ? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

chandrakant dada patil tweet viral

टीम महाराष्ट्र देशा: महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना नेटकऱ्यांनी चांगलाच ट्रोल केलं आहे. २० तासापूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी ”कोल्हापूर जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजेनेतून पूर्ण झालेल्या रस्त्याचे उद्घाटन केले” असे ट्विट केले होते. मात्र नेटकऱ्यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली.

नेटकऱ्यांनी कराड ‘कोल्हापूर’ जिल्ह्यात नसून ‘सातारा’ जिल्ह्यात आहे, असे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा कराड शहर कोणत्या जिल्ह्यात आहे हे माहित नसल्यामुळे नेटकऱ्यांनी चंद्रकांत दादांना चांगलच लक्ष केले आहे.

अरे चंद्रकात दादा किती वेळा चुकताय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

चंद्रकांत दादांनी चूक लक्षात आल्यानंतर ट्विट डिलीट केले मात्र फेसबुकवर ट्विट सध्याही आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर चंद्रकांत दादा पाटील चर्चेचा विषय बनले आहेत.

twitter and facebook post chandrakant dada

कराड शहर गुगलवर सर्च केल्यानंतर ही माहिती मिळते. 

कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर आहे. हे कराड तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. कराड तालुका भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक तालुका आहे.

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड मध्ये यशवंतराव चावण यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र आहेत.

Reference Google

Karad is a city in Satara district in the southern part of Indian state of Maharashtra and it is 290 km (180.19 miles) from Mumbai and 159 Km from Pune. It lies at the confluence of Koyna River and the Krishna River. The two rivers originate at Mahabaleshwar, which is around 100 km from Karad. They diverge at their origin, and travel for about the same distance to meet again in Karad. The rivers meet exactly head on, thus forming letter which is the only head on confluence in the world. Hence Krishna and koyna river’s confluence is called Preeti Sangam, meaning Confluence of Love. Karad is well known for sugar production and is known as the sugar bowl of Maharashtra owing to the presence of many sugar factories in and around Karad. It is considered as an important educational hub in Western Maharashtra due to the presence of many prestigious educational institutes. This place is also known for resting place or (Samadhi) of the first chief minister of Maharashtra Shri. Yashwantrao Chavan situated at the confluence of Krishna and Koyana river.Loading…
Loading...