‘महाविकास आघाडी सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार?’, प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील पोसरे येथे दरडग्रस्तांना धनादेशाद्वारे मदत देण्यात आली होती. पण दुसऱ्याच ते चेक दिवशी परत घेण्यात आले. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि नंतर देणार अस सांगितलं असेल तर हे दुर्दैवी आहे. पालकमंत्री आणि हे राज्य सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार आहेत?’ असा सवाल दरेकरांनी केला आहे.

राज्य सरकारने पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली. या पॅकेजवरुन प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पॅकेजची किंमत ही पुरेशी नाही, तसेच ‘आम्ही घोषणा करणारे नाही’ असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच पॅकेजची घोषणा केली आहे, असं म्हणत दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

‘राज्याने याआधी तोक्ते चक्रीवादळ तसेच निसर्ग चक्रीवादळचा सामना केला. या संकट काळातही राज्य सरकारने मदत जाहीर केली होती. त्या मदतीपैकी ६०% लोकांना अद्यापही मदतच मिळाली नाही’, असं दरेकरांनी नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या