आतापर्यंत ‘पद्मावत’ चित्रपटाने किती कमावले ?

padmavat story

टीम महाराष्ट्र देशा: करणी सेनेच्या विरोधानंतरही ‘पद्मावत’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला आहे. पेड प्रीव्ह्यूचा दिवस धरुन पहिल्या चार दिवसात ‘पद्मावत’ने ८३ कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच पहिल्या एक्स्टेंडेड वीकेंडला ‘पद्मावत’ सहज १०० कोटींची कमाई पार करेल, असं चित्र आहे. चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला असला, तरी प्रेक्षकांसाठी २४ जानेवारीच्या संध्याकाळीच पेड प्रीव्ह्यूचं आयोजन करण्यात आलं होतं. एका संध्याकाळच्या पेड प्रीव्ह्यूत ‘पद्मावत’ने पाच कोटींची कमाई केली.

दीपिकानं यावर ट्विटही केलंय. मला किती आनंद झालाय आणि किती अभिमान वाटतोय, हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत, असं ती लिहिलंय. इतक्या वादंगाला सामोरं जाऊनही पद्मावतनं चांगली कमाई केली. प्रेक्षकांनीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद देऊन करणी सेनेच्या आक्षेपांना चुकीचं ठरवलं, असं तज्ज्ञांचं मत आहे. शिवाय सिनेमातल्या दीपिकाच्या भूमिकेचंही कौतुक होतंय.