भाजप मंत्र्यांना अच्छे दिन; जाणून घ्या मंत्र्यांच्या संपत्तीत किती पटीने झाली वाढ

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने भ्रष्टाचारच्या मुद्द्यावर काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचून आता 4 वर्षे झाली आहेत. 26 मे 2018 रोजी भाजप चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या 2जी, कोळसा घोटाळ्यांसारख्या मुद्द्यांवरून रान उठवत मोदी सरकारने भारतातील तमाम जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता हस्तगत केली, परंतु जनतेला अच्छे दिन न येता मोदी सरकार मधील मंत्र्यांनाच अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर चांगला कारभार केला जाईल, सर्व खासदार व मंत्री उत्कर्ष होईल असे काम करतील, ना खाऊंगा, ना खाणे दुंगा आशा सर्वसामान्यांना आकर्षित करणाऱ्या घोषणा केल्या गेल्या, परंतु आता याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसत असून स्वतः मोदी यांच्या संपत्तीत जवळपास 41.8 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

Loading...

नॅशनल इलेक्शन वॉच(एनईडब्लू) आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म 2016च्या एका रिपोर्टनुसार, मोदी मंत्रिमंडळातील 78 पैकी 72 मंत्री कोट्यधीश आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 2014 पासून 2017पर्यंत जवळपास 41.8 टक्के(1.41 कोटी ते 2 कोटी रुपये) वाढ झाली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री सदानंद गौडा यांच्या संपत्तीत 42.3 टक्के(4.65 कोटी रुपयांहून 6.62 कोटी रुपये) वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या संपत्तीत 2015-17 या कार्यकाळात अधिक वृद्धी झाल्याचं समोर आलं आहे.

2015-17दरम्यान तोमर यांच्या संपत्तीत 67.5 टक्के(2014-15मध्ये 53 लाखांहून अधिक संपत्ती वाढून 2016-17मध्ये 89 लाख )वाढ झाली. तर मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची संपत्ती कमी झाल्याचं उघड झालंय. जावडेकर यांची संपत्ती 50 टक्क्यां(1.11कोटी रुपयांवरून 56 लाख रुपयांवर गेली आहे.

केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांच्या संपत्तीत 23.5 टक्के(7.97 कोटी रुपयांवरून 9.85 कोटी रुपये) वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उत्पन्नातही 17.4 टक्के(4.55 कोटी रुपयांवरून 5.34 कोटी रुपये) वाढ झाली. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंघ यांच्या उत्पन्नात 12.5 टक्के(69 लाखांहून 78 लाख रुपये) नोंदवण्यात आली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'