मोदींनी किती बेरोजगारांना रोजगार दिला – अशोक चव्हाण

ashok chawan

सोलापूर – सत्तेत येताना मोदींनी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र देशात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन ४ वर्ष झाली. मात्र, अद्याप बेरोजगारांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, ज्या नोकऱ्या होत्या त्यामध्ये देखील घट झाली आहे. अशी टीका करतांनाच गेल्या ४ वर्षांत मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले.

सोलापूर दौ-यावर आलेल्या चव्हाण यांनी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. दिल्ली येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, उत्पादित शेतमालाला हमीभाव, नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफीचा ठराव केल्याचे चव्हाण म्हणाले. निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही़ देशातील बेरोजगारी वाढली आहे़ अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

Loading...

दरम्यान त्यांनी यावेळी सेनेवर देखील निशाणा साधला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व विषयांना मंजुरी द्यायची आणि बाहेर आल्यावर त्याच विषयांना विरोध दाखवायचा, असा कार्यक्रम सेनेने सुरू केला आहे़. समृद्धी महामार्ग असो की नाणार प्रकल्प दोन्हींबाबत खुद्द उद्धव ठाकरे यांचीही भूमिका दुटप्पी असल्याचे स्पष्ट झाले आहे़. त्यामुळे सेनेने जनतेचा विश्वास गमावला आहे़ सध्याच्या परिस्थितीला भाजपाबरोबर सेनाही तितकीच जबाबदार असल्याचे चव्हाण म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!