Share

Nitesh Rane । “ठाकरे रमेश लटके यांना कितीवेळा भेटले?”; नितेश राणे यांचा खोचक सवाल

अमरावती : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये अंधेरी (पूर्व) पोट निवडणूकीचं वारंही सगळीकडे घुमत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नाहीय. हा भाजपचा डाव असल्याचे आरोप ठाकरे गटाकडून केले जात आहेत. अशातच नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमरावतीमध्ये भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी आलेले आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना जर लटके कुटुंबाविषयी एवढीच सहानभुती होती तर त्यांनी स्पष्ट करावं की ते रमेश लटके यांना  कितीवेळा भेटले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री, आणि पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यांनी रमेश लटके यांना वेळ दिला का? त्यांना किती वेळ मातोश्रीबाहेर उभे राहावे लागेल असा खोचक सवाल देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

‘उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे’, असं नितेश राणे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांना खरच ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायची आहे की? त्यांच्या जागी दुसरा एखादा उमेदवार उभा करून त्यांच्या सहानुभूतीचा फायदा घ्यायला आहे? हे आधी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. कायदा सर्वांना समान असल्याचं नितेश राणे यावेळी म्हणालेत. त्यामुळे लटके यांचा जो काय निर्णय होईल तो कायद्याने होईल. देशात कायद्याचं राज्य आहे.  संयम ठेवा, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे. उद्या सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचं नितेश राणेंनी यावेळी बोलताना सांगितलं.

ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगर पालिकेकडून स्वीकारला जात नसल्यामुळे या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवार देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केल्याबाबत विचारणा केली असता नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे काय करतात, याची मला चिंता नाही. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे”, अशा शब्दांत राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

महत्वाच्या बातम्या :

अमरावती : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये अंधेरी (पूर्व) पोट निवडणूकीचं वारंही सगळीकडे घुमत आहे. या निवडणुकीत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now