fbpx

पालघर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करा- कॉंग्रेस

sachin-sawant-palghar

पालघर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? तसेच कुठे भेद केला ? याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

काँग्रेससह बहुपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिका-यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली.

सचिन सावंत म्हणाले, ऑडिओ क्लिपमधील मुख्यमंत्र्यांची भाषा ही आश्चर्यकारक, धक्कादायक आणि लोकशाहीला घातक आहे. यामध्ये साम, दाम, दंड, भेद असे शब्द वापरत असताना मुख्यमंत्र्यांकडून किती लोकांना दाम दिला? किती लोकांना दंडित केले? व कुठले भेद केले? याची विचारणा निवडणूक आयोगाने करावी. तसेच काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम आहे, काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम आहे, असे सावंत म्हणाले.