‘सरकारविरोधी परखड मतं मांडणारी किती तोंडं तुम्ही बंद करणार?’; मुंडेंचा सरकारला सवाल

dhananjay-munde..

टीम महाराष्ट्र देशा – सांस्कृतिक, कलाविषयक धोरणांवर टीका केल्याने ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवलं. कला क्षेत्राशी संबंधित संस्थांचे स्वातंत्र्यही धोक्यात आले आहे. सरकारविरोधी परखड मतं मांडणारी किती तोंडं तुम्ही बंद करणार? ही लोकशाही आहे, विचारांचा आदर करा, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

सरकारविरोधी परखड मतं मांडणारी किती तोंडं तुम्ही बंद करणार? असा सवाल सरकारला करत, ही लोकशाही आहे, विचारांचा आदर करा, असा सल्ला सरकारला मुंडे यांनी दिला आहे.

शनिवारी सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण सुरु असताना ते सरकार विरोधी बोलत असल्याचं लक्षात आल्याने आयोजकांनी त्याचं भाषण थांबवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.पालेकर हे सरकारवर टीका करत असल्यानेच , आयोजकांनी त्यांना रोखलं होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बरवे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यातील ‘इनसाईड द एम्प्टी बॉक्स’ या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रकार अमोल पालेकर यांनी हजेरी लावली होती त्यावेळी ते बोलत असताना हा सगळा प्रकार घडला आहे.

भाषण करत असताना पालेकरांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एका निर्णयाला विरोध करत टीका केली. त्यावेळी त्यांना कार्यक्रमाच्या मॉडरेटरने टीका करण्यापासून रोखलं.

ज्याप्रमाणे नयनतारा सेहगल यांना निमंत्रण देऊन नंतर त्यांना बोलण्यास नकार देण्यात आला. त्याचप्रणाणे तुम्ही मला बोलण्यापासून रोखत आहात का?, असा सवाल पालेकरांनी मॉडरेटरला केला. या घटनेचा आता सगळ्याच स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.