८ महिने तब्येत बरी नसल्याचे सांगणारे लालू प्रचारासाठी फिट कसे झाले?

lalu prasad yadav

टीम महाराष्ट्र देशा- तुरुंगातून बाहेर येण्यासाठी कैद्यांकडून हमखास दिले जाणारे कारण म्हणजे तब्ब्येतीचे कारण. हेच कारण पुढे करून अनेक कैदी रुग्णालयात सुखात पहुडलेले पहायला मिळतात. राजकारणी तर यात खूपच पुढे असतात. सत्तेची चटक लागलेले राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी प्रचारात सहभागी होण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.

यादव यांना चारा घोटाळ्यातील विविध प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र ते तुरुंगात कमी आणि रुग्णालयात जास्त असल्याचं वारंवार समोर येते. मग शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव आत्तापर्यंत रुग्णालयात भर्ती होते , मग निवडणुकीच्या प्रचारासाठी ते ठणठणीत कसे झाले असा रोकठोक सवाल सीबीआयच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केला आहे.

लालूप्रसाद यादव यांनी फक्त ६ महिने तुरुंगात घालवले असून उरलेले ८ महिने त्यांनी तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे करत रुग्णालयात घालवले आहेत. सीबीआयने मार्च २०१८  ते मार्च २०१९  या काळामध्ये लालू यांना भेटायला आलेल्या ८०  राजकारण्यांच्या नावाची यादीही न्यायालयाला सादर केली आहे. लालू यांना अत्याधुनिक सुविधा असलेल्या विशेष वॉर्डात ठेवलं असून तिथून ते राजकीय काम देखील करत होते असं सीबीआयने न्यायालयाला सांगितलं आहे.