जेव्हा ना’पाक’ खेळीला कुलभुषण जाधवांच्या आईने लावला लगाम

kulbhushan jadhav and mother meet

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नागरिक कुलभुषण जाधव यांच्या आईं आणि पत्नीला पाकिस्तानने दिलेल्या वागणुकीवर सध्या देशभरातून चांगलीच टीका केली जात आहे. मात्र एवढी वागणूक देवूनही कुलभूषण यांच्या आई अवंती जाधव यांनी भेटी दरम्यान पाकिस्तानच्या नापाक खेळीवर पाणी फेरल्याच दिसत आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तीळ पापड झाला असेल

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये कुलभूषण जाधव यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान अवंती जाधव यांनी साहस दाखवत हा कारनामा केला आहे. आई आणि पत्नीच्या भेटीवेळी कुलभूषण हे पाकिस्तानकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट बद्दल बोलत होते. यावेळी अवंती यांनी त्यांना थांबवल आणि सांगीतले की ‘ तू अस का बोलत आहेस, तू तर इरानमध्ये व्यापार करत होतास. जेथून तुझ ह्या लोकांनी अपहरण केल आहे. तु हे सर्व सत्य सांगिलते पाहिजे’. तसेच पाकिस्तान आणि आयएसआयने दिलेली स्क्रिप्ट वाचू नको असही ७० वर्षाच्या अवंती जाधव यांनी ठणकावून सांगितले.

या भेटीवेळी जाधव यांनी दोघींना वेगळ्या प्रकारे अभिवादन केल होत. ज्यावरून ते पाकिस्तानच्या दबावाखाली त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप ते मान्य करत असल्याच वाटल. कुलभूषण जाधव यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पहिल्यापासून भारताने धुडकावले आहेत