गुरूजी असे कसे हो तुमचे शिष्य? विचारत जितेंद्र आव्हाडाचा ट्विट

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो ट्विट करत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये भिडे गुरुजींसोबत अविनाश पवार आहे. हा फोटो ट्विट करत गुरूजी असे कसे हो तुमचे शिष्य? अविनाश पवार ह्यांनी मला ठार मारण्याची तयारी केली होती, अगदी घरापर्यंत येऊन गेलो हात. सांगलीत तुमच्या शिष्याने जीवघेणा हल्ला केला हीच का तुमची शिकवण? असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण घडले तेव्हाही मीरज दंगलीतला भिडे गुरुजींचा फोटो ट्विट करत हा फोटो कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला होता. मीरजच्या दंगलीत संभाजी भिडे यांना त्यांचे समर्थक पोलिसांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा हा फोटो आहे. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी फोटो ट्विट करत अशाच प्रकारे टीका केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा तशीच टीका केली आहे.