मुंबई : शिवसेनेच्या उमेदवाराला मत न दिलेल्या आमदारांची नावे कशी कळाली? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना केला आहे. तुम्ही सहा आमदारांवर गद्दारीचा आरोप कसा केला? आमदारांची नावे कशी आणि का घेतली? ते तुमच्या स्वप्नात आले होते का? असे प्रश्न सोमय्या यांनी विचारले आहेत. “शिवसेनेकडून आता निवडणुकांची माफियागिरी होत आहे, त्यांनी आमदारांची नावे कोणत्या आधारे घेतले आहेत? असे सोमय्या म्हणाले आहेत. यावर आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
“काही छोटे पक्ष आहेत जे आपले उमेदवार उभे करू शकत नाहीत ते कुणालाही मतदान करू शकतात. पण कुणी कुणाला मत दिले हे तुम्हाला कसं कळालं, किंवा निवडणूक आयोगाला तरी कसं कळालं? याचं उत्तर संजय राऊत यांना द्यावा लागणार आहे. याचा अर्थ शिवसेनेने आचारसंहितेचा आणि गोपनियतेचा भंग केला आहे.” असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत. यावर आता दीपाली सय्यद यांनी ट्विट करत सोमय्या यांच्यासोबतच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.
निवडणुक गोपनीयतेचा भंग म्हणून बोंबलणार्या चिरीट तोम्मयाला ईडीच्या गोपनीयतेच्या भंगाची आठवण आहे का?भाजपच्या तिसर्या उमेद्वारासाठी जादा मतदान होणार हे मतदानापुर्वीच फडणवीसांना कसे कळले? चौकशी तर व्हायालाच पाहिजे!नाव घेतलेल्या आमदारांची आणि फडणवीसांची. @ShivSena @BJP4Maharashtra
— Deepali Sayed (@deepalisayed) June 12, 2022
दीपाली सय्यद आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “निवडणुक गोपनीयतेचा भंग म्हणून बोंबलणार्या चिरीट तोम्मयाला ईडीच्या गोपनीयतेच्या भंगाची आठवण आहे का?भाजपच्या तिसर्या उमेद्वारासाठी जादा मतदान होणार हे मतदानापुर्वीच फडणवीसांना कसे कळले? चौकशी तर व्हायालाच पाहिजे!नाव घेतलेल्या आमदारांची आणि फडणवीसांची.”
महत्त्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<