‘फनी’ चं नावं कसं ठरलं? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात?

टीम महाराष्ट्र देशा :अत्यंत घातक असे फनी चक्रीवादळ जेव्हा ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आणि त्याच्याविषयी अनेक चर्चा सुरु झाल्या. या चक्रीवादळाला ‘फनी’ नाव का ठेवले ? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? आज याबाबत जाणून घेऊयात.

Loading...

‘फनी’चा उच्चर ‘फोनी’ असा होतो. तर त्याचा अर्थ ‘साप’ आहे. ‘फनी’ चक्रीवादळाचं नाव बांगलादेशकडून सुचवण्यात आलेल्या नावामधील आहे.

चक्रीवादळांची नावं कशी ठरतात?

१९५३  पासून अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावे ठरण्यास सुरुवात झाली. हिंदी महासागर क्षेत्रातील ८ देशांनी (बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंका) भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचे २००४ पासून नामकरण करण्याची व्यवस्था केली. या प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८, अशी ६४नावे ठरवून दिली आहेत.

चक्रीवादळ कसे तयार होते?

जेव्हा शीत कटिबंधातून येणारी थंड हवा आणि उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण हवा एकत्र होते, तेव्हा समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यालाच चक्रीवादळ असे संबोधले जाते. शीतोष्ण आणि उष्ण असे चक्रीवादळाचे दोन प्रकार असतात.Loading…


Loading…

Loading...