मुंबई : ज्या वाझेच्या अटकेसाठी एनआयए आणली त्याच वाझेच्या पत्रावर भाजपला एवढा विश्वास कसा? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी उपस्थित केलाय. वाझे स्वत:ला निर्दोष म्हणतोय त्यावरही भाजपचा विश्वास आहे का? असे देखील डॉ. वाघमारे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहे.
काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी सचिन वाझे प्रकरणात भाजपवर पलटवार केलाय. वाघमारे म्हणाले की, ’देवेंद्रजी व भाजप उत्तर द्या? परमवीर सिंह, सचिन वाझे हे भाजपसाठी राष्ट्रीय महापुरुष आहेत का? वाझेच्या अटकेसाठी NIA आणली, त्याच वाझेच्या लेटरवर भाजपला पूर्ण विश्वास कसा? वाझे निर्दोष, हिरेंनची हत्या केली नाही म्हणतोय, ते भाजप खरे मानणार का? हे अधिकारी त्यांची बदली, अटक, शक्यता मग दबावाने स्वतःच्या सुटकेपोटी विशिष्ट मंत्र्यांना टार्गेट करून पत्र लिहिणार व त्याच्यावर विश्वास कसा? NIA, ED, CBI, IT फक्त विरोधी नेत्यांना कसे टार्गेट करतात?’
इतकेच नाही तर राफेल, नोटबंदी, विजय मल्ल्या विविध प्रश्नांवर आरोप झाले भाजपच्या कोणी राजिनामा दिला? असा प्रश्नही डॉ. वाघमारे यांनी उपस्थित केलाय. सचिन वाझे याने लिहिलेल्या पत्रात शिवसेना नेते अनिल परब यांचे नाव आल्याने भाजपच्या वतीने त्यांच्यावर टीका केली जातेय. इतकच नाही तर या पत्रात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेही नाव आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘आपले अपयश झाकण्यासाठीच केंद्रिय आरोग्य मंत्र्यांनी पत्रक काढून उर बडवायला सुरवात केलीय’
- ‘चेन्नई सुपर किंग्स पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही’ ; तीन माजी क्रिकेटर्सचं विधान
- लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, धनंजय मुंडेंचे आवाहन
- फोर्ब्सच्या धनकुबेरांच्या यादीत सायरस पूनावाला प्रथमच पहिल्या दहात सामील
- निलेश राणे यांच्या सुचनेनंतर लांजा कोविड सेंटर सुरु करण्याला आला वेग