‘राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो?’

YOGESH THAKUR

मुंबई: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी समर्थक अतिरेक्यांचा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी ६ अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्र, दिल्ली व उत्तर प्रदेश याठिकाणाहून अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र यावरूनच भाजपचे नेते योगेश सागर यांनी राष्ट्रवादी तसेच ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

‘दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह ३ राज्यातून ६ अतिरेकी पकडले आहेत.त्यांचा मुंबईसह देशातल्या महत्त्वाच्या शहरात २६/११ सारखा हल्ला करायचे नियोजन होते.या कटाचा सूत्रधार अनिस इब्राहिम आहे. मात्र राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो? असा सवाल करणारे ट्वीट भाजपचे योगेश सागर यांनी केले आहे.

राज्याचे सध्याचे गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आहेत. त्यांना अप्रत्यक्ष टोला योगेश सागर यांनी लगावला आहे. दरम्यान कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला.

महत्त्वाच्या बातम्या