ज्यांना संसार चालवण्याचा अनुभव नाही ते देश कसा चालवणार ?- धनंजय मुंडे

शिरोळा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देश चालवण्याचा अनुभव नाही. आयुष्यात त्यांनी कधी घरातला किराणा तरी आणला आहे का, व्यवहार केला आहे का, यांना संसार चालवण्याचा अनुभवच नाही तर ते देश कसा चालवणार ? असा प्रश्न उपस्थित केला.

धनंजय मुंडे म्हणाले, जनता जर जागरूक राहिली तर लोकं देशाच्या चौकीदाराची पुन्हा नेमणूक करणार नाही. जनतेत इतका रोष आहे की आताच्या सत्ताधाऱ्यांना २०१९नंतर कोणी ओळखणारही नाही. भाजपने तरुणांचा अपमान केला आहे. हा तरुण आता या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. असेही मुंडे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...