फेसबुकवर मंत्री-प्रधानमंत्री बनणाऱ्यांनो सावधान; तुमची माहिती चोरली जातेय ?

cambridge analytica deta theft marathi

फेसबुक म्हणजे संपूर्ण जगाला भुरळ घातलेला सोशल मिडियातील एक महत्वाचा भाग. आज मुल जन्मल तरी त्याचे आईवडील बाळाचेही फेसबुकवर प्रोफाईल बनवतात, कोणतेही काम करताना, खाते वेळी आणि झोपतानाही आपण सोशल मिडीयाचा वापर करतोच, यावरूनच आपल्या दैनंदिन जीवनावर फेसबुक व्हाटस्अप सारख्या सोशल मिडीयाने किती परिणाम केला आहे हे समजून येते. मागील काही दिवसांपासून आपण सोशल मिडिया वापराची परिसीमा ओलांडली असून कोणतेही नवीन फिचर आल्यास ते वापरण्याची घाई करतो. पण आता उघडकीस आलेल्या फेसबुक डेटा चोरी प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली असून कदाचीत आपलाही डेटा चोरी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्याला घरातील लोकही विचारत नाहीत अशा व्यक्तीही फेसबुकवर आजकाल आमदार, खासदार, मंत्री आणि थेट प्रधानमंत्री देखील बनत आहेत. काही वेळेसाठी हा गमतीचा भाग मानला तरी हे सर्व होत असताना आपली माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पोहचवत आहोत याची कल्पना देखील येत नाही. फेसबुकवर असणाऱ्या अशाच अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पाच कोटी अमेरिकन जनतेची खाजगी माहिती ‘केंब्रिज अॅनालिटिका’ सारख्या संस्थेला विकली गेली, त्याचा वापर अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केला गेल्याची कबुली खुद्द मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे.

Loading...

अशी होते तुमच्या खासगी माहितीची चोरी

फेसबुक हे एक स्वतंत्र सोशल मिडीया माध्यम असून ते वापरणाऱ्यांसाठी अधिक रंजक बनावे यासाठी इतर थर्ड पार्टी अॅपला त्याच्या वापराची परवानगी देत, मात्र या थर्ड पार्टी अॅपवर लॉगइन करते वेळी तुमची सर्व खासगी माहिती आपल्या नकळत घेतली जाते. अशाच प्रकारच्या चोरी प्रकरणामुळे सध्या जगभरात थेट फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे काही वेळासाठी मनोरंजक वाटणाऱ्या गोष्टीमुळे आपणच चोराच्या हातात आपली माहिती देत असल्याच भान राखण गरजेच आहे. त्यामुळे एखादे अॅप्लिकेशन वापरताना तुमच्या मोबाईलमधील कोणत्या कोणत्या गोष्टी अॅक्सेस करण्याची परवाणगी देताय याची काळजी घ्यावी.

काय आहे केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण
२०१६ मध्ये झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेवटपर्यंत हिलेरी क्लिंटनयांचे पारडे जड होते, मात्र आश्चर्यकारक विजय मिळवला तो डोनाल्ड ट्रम्प यांनी. ट्रम्प यांची निवडणूक प्रचार यंत्रणा राबवताना त्यांना मदत झाली ती राजकीय डेटा विश्लेषक कंपनी असणाऱ्या केंब्रिज अॅनालिटिकाची. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या दोन वर्ष आधी म्हणजेच २०१४ मध्ये फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर तब्बल २ कोटी ७० लाख लोकांनी कोगन फेसबुक अॅप इन्स्टॉल केलं. हे अॅप म्हणजे क्विझ असल्याचा बनाव केला गेला. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुक युजर ही क्विझ खेळत असेल तर त्याच्या अकाऊंटमध्ये असलेल्या जवळपास १६० युजर्सच्या पर्सनल माहितीचा अॅक्सेस कोगनला मिळायचा. अशा प्रकारे त्यांनी जवळपास ५ कोटी लोकांची वयक्तिक माहिती चोरून ती केंब्रिज अॅनालिटिकाला विकली, तसेच पुढे त्याचा वापर ट्रम्प यांच्याबाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी केल्याचा आरोप होत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर