पैसा काळ्याचा पांढरा झाला की काय ? राहुल गांधींचा मोदींना सवाल

टीम महाराष्ट्र देशा : स्विस बँकेत २0१७ साली जमा झालेल्या भारतीय पैशावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी २0१४ पर्यंत स्विस बँकेत काळा पैसा आहे, सत्तेत आल्यावर आपण तो परत आणू, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे सांगत होते. आता स्विस बँकेतील भारतीयांचा सारा पैसा काळा नाही, असे सांगत असून, ४९ महिन्यांत काळा पैसा पांढरा कसा झाला, असा सवाल कॉंग्रेसने केला आहे.

२0१७ मध्ये तर ७000 कोटी जमा झाले. आता मात्र तुम्ही हा सारा पैसा काळा नाही, असे सांगता. त्यामुळे पैसा काळ्याचा पांढरा झाला की काय, याचे उत्तरही द्या. असा थेट प्रश्न कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.