राष्ट्रवादी निर्धार परिवर्तन यात्रेच्या बॅनरवरून क्षीरसांगराचा फोटो गायब

blank

टीम महाराष्ट्र देशा – बीड मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर आणि तिथल्याच स्थानिक नेत्यांमध्ये वाद आहेत. ते वाद सतत या ना त्या कारणावरून समोर येत असता. आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आता वाढत चालेला दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी बीडमध्ये जयदत्त क्षीरसांगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावत, विविध विकास कामाचा शुभारंभ केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या एकही नेत्याला बोलवण्यात आले नव्हते.

तर आता २३ फेब्रुवारी रोजी परळीमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्धार परिवर्तनच्या जाहीर कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागराना स्थान दिले नसल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या बॅनर आणि कटाऊट मधून क्षीरसागराचा फोटो गायब झालेला दिसत आहे.

तस पाहिलं तर जयदत्त क्षीरसागर यांची गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांशी सलगी वाढवत आहेत. कोणतेही निमित्तसाधून भाजपा नेत्यांशी उठबस वाढवत आहेत.

काही दिवसांपूर्वीच बीड शहरातीलतब्बल चारशे कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दिमाखात पार पाडत राष्ट्रवादी वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.

आगामी 23 फेब्रुवारी रोजी परळीमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची जंगी तयारी सुरू आहे, ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रत्येक मतदार संघाचे नेत्यांना स्थान दिले गेले. यात माजी मंत्री प्रकाश सोळुंके, अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बाळासाहेब अजबे, पृथ्वीराज साठे तसेच आयोजकांमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे याचे फोटो आहेत. पण, यात फक्त जयदत्त क्षीरसागर फोटो नाही