राज्यातील हॉटेल्स, मॉल्स सुरु पण नाट्यगृह,चित्रपटगृह आणि धार्मिक स्थळे राहणार बंदच

राज्यातील हॉटेल्स, मॉल्स सुरु पण नाट्यगृह,चित्रपटगृह आणि धार्मिक स्थळे राहणार बंदच

uddhav

मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आली होती. या आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय झाले आहेत. यामध्ये 15 ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉल्सची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयामुळे हॉटेलचालकांच्या लढ्याला यश आले आहे. 15 ऑगस्टपासून हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु राज्यातील नाट्यगृह,चित्रपटगृह, आणि धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान भाजपने गेल्या काही दिवसांपासून मंदिरे उघडण्याची मागणी लावून धरली होती त्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु ठाकरे सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे.

दरम्यान भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दोन दिवसात मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी मंदिरे खुली न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे आता या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या