सोलापूर : कोणाचातरी बदला घेण्यासाठी किंवा कोणाबरोबर काही गैरवर्तंन करण्यासाठी ताफा अडवल्याचं तुम्ही ऐकलं असेल मात्र शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्याबरोबर वेगळा प्रकार घडला. चक्क हॉटेलमध्ये पार्टी केल्यानंतर बिल न दिल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोतांचा ताफा अडवण्यात आला. सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता असा अजब प्रकार घडला. या मालकाने सदाभाऊ खोतांच्या ताफ्यासमोर मोठा गोंधळ घातला होता. सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे.
सांगोला तालुक्यातील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी अशोक शिनगारे यांनी “आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा”, असे म्हणत सदाभाऊंच्या गाडीचा ताफा अडवला. हॉटेल चालक सदाभाऊ गाडीतून उतरताच त्यांना बोलू लागला त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.
सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल चालक ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत खाली उतरताच उधारी देण्याची मागणी केली. “आधी माझी उधारी द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही”, अशोक शिनगारे म्हणाले.
काय म्हणाले सदाभाऊ खोत ?
“मी त्या मालकाल ओळखत नाही. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शन करणार होते पण माझा ताफा लवकर आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीकडून मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे,” असे सदाभाऊ खोत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :