रुग्णालयांच्या जाहिरातींमधील चिकित्सकांना करावा लागणार कारवाईचा सामना

blank

टीम महाराष्ट्र देशा : केरळमधील एका कॉर्पोरेट रुग्णालयाची जाहिरात करण्यासाठी तेथे काम करणाऱ्या चिकित्सकांची छायाचित्रे आणि संबंधित तपशील एका वृत्तपत्राच्या जाहिरातीत दिसून आला, ज्यामुळे भारतीय वैद्यकीय परिषदेनी (MCI) ठरवून दिलेल्या नैतिकतेशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाले आहे.

अश्याच एका प्रकरणामध्ये MCI ने वैद्यकीय संस्थांच्या एका गटविरूद्ध कारवाई केली होती. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे १५ दिवसांकरिता भारतीय नोंदणीतून त्यांचे नाव काढून टाकण्यात आले होते.

२००२ सालाच्या भारतीय वैद्यकीय परिषद नियमांमधील वैद्यकीय नैतिकतेशी संबंधित आचारसंहितेनुसार, रुग्णांना आमंत्रण करण्यासाठी नावे किंवा छायाचित्रांसह चिकित्सकांची जाहिरात करणे प्रतिबंधित आहे.

भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) भारतात वैद्यकीय शिक्षणाचा एकसमान आणि उच्च दर्जा राखण्यासाठी त्यासंबंधित मानदंड स्थापित करण्यासाठी असलेली एक संस्था आहे. ही संस्था महाविद्यालयांना आणि चिकित्सकांना मान्यता देते तसेच भारतामधल्या चारणाऱ्या वैद्यकीय सरावांवर देखरेख ठेवते.