‘महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही, ऑक्सिजन नाही, ठाकरे सरकार जागा व्हा’

kirit somayya VS udhhav thakre

मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान, कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील रुग्णालयात बेड रिकामे नाहीत, तसेच व्हेंटिलेटर्स चा तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच मुद्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला जागे व्हा म्हणत टोला लगावला आहे.

सोमय्या यांनी ट्विट केलं आहे कि, ‘महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही, ऑक्सिजन नाही.? नाशिक मध्ये बाबासाहेब कोळे चे हॉस्पीटल मध्ये एडमिशन, ऑक्सिजन नाही म्हणून मृत्यू झाले. असल्याच ट्विट सोमय्यांनी केल आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पत्नी सुरेखा ताई नी पत्रात व्यथा व्यक्त केलेल पत्र पण त्यांनी ट्विट वर शेअर केलं आहे.

यावेळी सोमय्यांनी ‘आमचा दोष काय!?’ असा सवाल करत ‘ठाकरे सरकार जागा व्हा’ असा टोला पण यावेळी त्यांनी लगावला आहे.

 

महत्वाच्या बातम्या