श्रेयवादाच्या लढाईत अडले महाविकास आघाडीचे घोडे

mahavikas aghadi

औरंगाबाद– औरंगाबाद शहरासाठी असलेली पाणीपुरवठा योजना असो किंवा गुंठेवारीचा प्रश्न. औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील बेबनाव समोर येतोय.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानिमित्त आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बेबनाव समोर आलाय. शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र या सर्व कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात येतंय. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

त्यातच आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे एकाच दिवशी शहरात आहेत. असे असताना देखील कार्यक्रमांच्या निमंत्रितांमध्ये सुप्रिया सुळे यांचा उल्लेख नाही. शहरात गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. अशा परिस्थितीत आगामी निवडणूक महाविकासआघाडी एकत्र लढविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र औरंगाबाद शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या निर्णयप्रक्रियेत, लोकार्पण सोहळ्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डावलत असल्याचे दिसून येतंय. या सर्व श्रेयवादाच्या लढाईत महानगरपालिका निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र लढणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय.

महत्वाच्या बातम्या