सिलेंडरसह एमआरआय मशिनने त्यालाही खेचले; जीवाचा थरकाप उडवणारा मृत्यू

मुंबई- मुंबईच्या नायर रुग्णालयात अत्यंत विचित्र अपघात घडला असून यामध्ये एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजेश मारू (वय ३२) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

राजेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशच्या बहिणीच्या सासूची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी रुग्णाचा एमआयआर करण्यास सांगितले. त्यामुळे राजेश पेशंट आणि मेहुण्यासोबत एमआरआय रुमकडे निघाले. एमआरआय मशीन असलेल्या रुममध्ये जाण्याआधी बाहेर असणाऱ्या वॉर्डबॉयने सुरक्षेच्या कारणास्तव राजेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि घड्याळ काढून घेतले.

दरम्यान वॉर्डबॉयने रुग्णासाठी असलेला ऑक्सिजन सिलेंडर राजेशला आत घेऊन जायला सांगितला. त्याने सिलेंडर नेह्ण्यास विरोध केला मात्र एमआरआय मशीन बंद असल्याच सांगण्यात आल्याने सिलेंडर घेवून राजेश रुममध्ये गेला, त्याचवेळी सुरु असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एमआरआय मशिनने सिलेंडर सोबत राजेशलाही खेचून घेतलं. त्याला त्वरीत बाहेर काढण्यात आलं, मात्र उपचारा दरम्यान राजेशचा मृत्यू झाला.

You might also like
Comments
Loading...