सिल्लोड तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक पुसला जाईल का?

Abdul Sattar

औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळी आणि अगदी थोड्या प्रमाणात बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतीचा भाग आहे. फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव हे कायमच दुष्काळग्रस्त भाग राहिले आहे. इथल्या नागरिकांना शेतीसाठी तर सोडाच पिण्याच्या पाण्यासाठी देखील आजही भटकंती करावी लागते. अशा परिस्थितीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार या भागात जास्तीत जास्त सिंचन योजना खेचण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे सत्तारांच्या सिल्लोड-सोयगाव मतदार संघावरील दुष्काळाचा हा कलंक पुसला जाईल का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्वांच्याच आशा वाढल्या आहेत.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. त्यासाठी अब्दुल सत्तार पाठपुरावा देखील करत आहेत. मात्र, या आधी देखील मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर अनेकदा बैठका झाल्या होत्या. यातून मराठवाड्याच्या वाट्याला किती फायदा आला, हा संशोधनाचा विषय ठरवा. यात वारंवार निर्णय बदलल्यामुळे देखील मराठवाड्याला फटका बसला.

जयंत पाटील यांनी देखील भराडी प्रकल्प रद्द करुन नवीन बंधारे बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. आता या निर्णयामुळे सिल्लोड तालुक्यातील जलसिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल की, त्यात आणखी गुंतागुंत वाढत जाईल, हे तर येणाऱ्या काळातच लक्षात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

IMP