‘नावासोबत पंजाबच्या कामगिरीतही बदल होईल अशी आशा’

पंजाब

चेन्नई : आजपासून रंगणार आयपीएलच्या थरार. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. आजचा पहिला सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. आज साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन या सामन्याला सुरुवात होईल.

यंदाच्या मोसमाधी काही संघाने आपले जर्शी बदलले होते. दरम्यान, पंजाब संघाने देखील मोसमाआधी पंजाब संघाने आपले नाव, लोगो आणि जर्सीमध्ये बदल केला आहे. या संघाचे मागील वर्षीपर्यंत किंग्स इलेव्हन पंजाब असे नाव होते, पण आता हा संघ पंजाब किंग्स नावाने ओळखला जाईल. नावासोबतच पंजाबच्या कामगिरीतही बदल होईल अशी या संघाचा कर्णधार लोकेश राहुलला आशा आहे.

दरम्यान, आयपीएलपूर्वी  विरोधी संघ प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा देताना दिसत आहेत. पंजाब किंग्जने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. पंजाब किंग्जचा आक्रमक खेळाडू ख्रिस गेल आपला क्वारन्टाईन काळ पूर्ण करून संघात परतला. त्यांनतर पंजाब किंग्सने ख्रिस गेलचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. यावरून समजत होते पंजाब किंग्सने सामना सुरु होण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :