fbpx

माननीय पंतप्रधान महोदय! जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय- शत्रुघ्न सिन्हा

narendra modi vr sinha

टीम महाराष्ट्र देशा: भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. “मोदीजी जनतेला भाषण नकोय रेशन हवंय” अशा शब्दात वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये झालेल्या ‘भारत की बात सबके साथ’ कार्यक्रमात मोदींनी केलेल्या भाषणावर टीका केली.

खासदार शत्रुघ्न सिन्हा भाजपवर नाराज आहे. त्यांची भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा चांगलीच रंगली होती. सिन्हा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान महोदय! तुम्ही लंडनमधील वेस्टमिनिस्टरमध्ये चांगले भाषण दिले. जे अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्केस्ट्रेटेड, कोरियॉग्राफ्ड आणि स्क्रिप्टेड होते. पण भारताच्या जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय, ते देण्यास तुम्ही सक्षम आहात. वेळ संपत आलीय. पण माझ्या सदिच्छा तुमच्याबरोबर आहेत. जय हिंद!