बाप मुलीवर प्रेम करू शकत नाही का?, हनीप्रीतने फेटाळले राम रहीमशी संबंधाचे आरोप.

baba ram rahim & honey prit

वेबटीम: बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या बाबा गुरमीत राम राहिमची मुलगी हनीप्रीत इन्सा अखेर जगासमोर आली आहे. सीबीआय कोर्टाने बाबा राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर हनीप्रीत फरार होती. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी तिला अटक होणार होती. मात्र अटकेच्या भीतीने हनीप्रीत फरार झाली होती.

‘इंडिया टुडे’शी बोलताना हनीप्रीतने तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मध्यंतरी हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याची चर्चा होती. मात्र मी भारत सोडून कोठेही गेले नसल्याचे सांगत नेपाळला पळून गेल्याच्या वृत्ताच तिने खंडन केले आहे. तसेच राम रहीमही निर्दोष आहेत, आपण त्यांना वडिलांप्रमाणे मानत असून आमच्या मधील नातं अतिशय पवित्र असल्याचे हनीप्रीतने सांगितले. तर एक बाप मुलीच्या डोक्यावर हात ठेवू तसेच मुलीवर प्रेम करु शकत नाही का? असा प्रश्न हनीप्रीतने उपस्थित केला आहे.