Share

Farming Update | पॉलिहाऊस मध्ये भाज्यांसोबत होऊ शकते मधाची शेती, कशी? ते जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतात आता पारंपारिक पद्धती बरोबर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती केली जाते. कृषी क्षेत्रात दररोज नवनवीन बदल होत आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला चालला मिळत आहे. ज्यामुळे शेतीवरील खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करता येईल. असाच एक आधुनिक पर्याय ICAR-IIHR च्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना फळे फुले भाजीपाला यासोबतच मधमाशा पासून उत्पादन मिळवता येईल.

आतापर्यंत शेतकरी शेतीबरोबरच कुक्कुटपालन, मत्स्यपालन इत्यादि व्यवसाय करून अतिरिक्त पैसा मिळवत होते. परंतु, आता शेतकऱ्यांना मध विकून अतिरिक्त पैसा कमावता येईल. कारण ICAR-IIHR च्या शास्त्रज्ञांनी पॉलिहाऊस मधून पिकासह मध उत्पादन करण्याचा मार्ग शोधला आहे. याच्या माध्यमातून शेतकरी मधमाशांचे मध काढून अतिरिक्त उत्पादन मिळू शकतात.

नक्की काय आहे हे?

अनेक वर्षाच्या शोधा नंतर ICAR-IIHR च्या शास्त्रज्ञांनी पॉलिहाऊस मधून मधमाशांचे मध काढून कसे उत्पन्न मिळवता येईल याचा शोध लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जातीच्या ‘एपिस सेराना’ आणि डंख नसलेल्या ‘टेट्रागोन्युला इरिडिपेनिस’ मधमाशांचा समावेश आहे. या माशा कीटक आणि रोगांपासून सुरक्षित वाढल्यावर पॉलिनेशन करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास मदत करतील.

पॉलिहाऊसला पिकांचे संरक्षक कव्हर म्हणून संबोधले जाते. कारण पॉलिहाऊस पिकांचे पाऊस, वारा, कीटक, रोग यापासून संरक्षण करते. त्यामुळे पिकांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. ICAR च्या शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले आहे ज्यामध्ये खरबूज आणि काकडी पिकांसाठी पॉलिहाऊस मध्ये ‘एपिस सेराना’ आणि डंखरहित मधमाशी ‘टेट्रागोन्युला इरिडिपेनिस’ चे एक युनिट लावले. मधमाशांचे युनिट अशा पद्धतीने बसवले होते जेणेकरून मधमाशांना आतून बाहेर प्रवेश करणे सोपे होते.

मधमाशांचे युनिट कसे स्थापन करायचे ?

पॉलिहाऊस मधमाशी पालन आणि क्रॉप पॉलिनेशन यावर चाललेल्या संशोधनात शास्त्रज्ञांना यश मिळाले. शास्त्रज्ञांनी मधमाशांची पेटी पॉलिहाऊसच्या छताला टांगली आणि त्याचबरोबर 8 फ्रेम  बॉक्स अशा प्रकारे ठेवले की मधमाश्याला त्यातून मागेपुढे करता येईल. यावेळी मधमाशा पॉलिनेशन सुरू करतात आणि मध आणि मेण गोळ्या करण्यासाठी मधपेटीकडे परत येतात. अशा रीतीने मधमाशा एका जागी बंदिस्त राहून मध एकत्र करतात. मधमाशी पालन हे आता देशात लोकप्रिय होत चालले आहे, कारण याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर चांगल्या पद्धतीने झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतात आता पारंपारिक पद्धती बरोबर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती केली जाते. कृषी …

पुढे वाचा

Agriculture

Join WhatsApp

Join Now