‘होणार सून..’फेम तेजश्री ‘या’ हिंदी चित्रपटात झळकणार

tejshri

मुंबई : ‘होणार सून मी घरची’ या मालिकेतून सर्वपरिचित झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान. त्यानंतर तिने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून लोकप्रिय झाली. लवकरच तेजश्री एका बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे.

तेजश्रीने सोशल मीडियावर तिच्या आगामी हिंदी चित्रपटातील काही फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. तिने ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटातून तेजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिने चित्रपटाची टीम आणि काही कलाकारांसोबत हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर लिहिले आहे की, ‘फायनली बबलू बॅचलर चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी दहा दिवस राहिले आहे.’ तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन तिचे अभिनंदन करत आहेत. चित्रपटात तेजश्रीसोबत शरमन जोशी आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अग्निदेव चटर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे.

तेजश्रीने ‘सून मी या घरची’ ‘अगंबाई सासूबाई’ ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.येत्या २२ ऑक्टोबर सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या