एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने शिक्षण, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण – अजित पवार

मुंबई : एशियन डेव्हलपमेंट बँकेने आतापर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे. आता येणाऱ्या काळात शिक्षण, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात पवार यांची भेट घेतली.

पवार म्हणाले की, महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर राज्यशासन भर देत आहे. असे करीत असताना सामाजिक क्षेत्राचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य आवश्यक आहे.

Loading...

एशियन डेव्हलपमेंट बँकेने महाराष्ट्रात गुंतवणूक केल्यास चांगल्या सुविधा निर्माण होऊ शकतील. एशियन डेव्हलपमेंट बँकेने या दोन्ही क्षेत्राबाबत आपला अभ्यास करुन राज्य शासनास प्रस्ताव सादर करावा असे पवार यांनी यावेळी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाबरोबरच सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी बँकेच्या शिष्टमंडळाला केले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, वित्त विभागाचे (वित्तीय सुधारणा) प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका