‘समलैंगिकता’ हा गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय…

नवी दिल्ली : समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे.

‘प्रत्येकाला आपल्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र अशी अोळख आहे. समाजातील लोकांनी आपली विचारधारा, मानसिकता बदलायला हवी’. ‘समलिंगी संबंध हा गुन्हा नाही’, असा महत्वपूर्ण, एेतिहासिक असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

यापूर्वी 2 जुलै 2009 मध्ये दिल्ली हायकोर्टांने निकाल देत समलैंगिक संबंध कायदेशीर ठरवले होते. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा समलैंगिकता गुन्हाच आहे, असा निर्णय दिला होता. पण मागीलवर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्वत: आपल्या निर्णयावर फेरविचार करायचं ठरवलं होतं आणि हा खटला पुन्हा सुरू झाला होता.