fbpx

जाणून घ्या : केसांच्या वाढीसाठी घराच्या घरी तेल कसं बनवाल?

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या केसांच्या अनेक समस्या असतात. कधी केस गळणे असत तर कधी केसांमध्ये कोंडा होतो. याच्यावरती उपाय म्हणून अनेक शाम्पू आपण वापरतो. पण या केमिकॅल चा वापर करण्यापेक्षा आपण आयुर्वेदीक चा वापर केला तर तो अधिक फायदेशीर ठरतो. हर्बल शाम्पू घरी कसा बनवायचा हे आपण जाणून घेऊ.

हल्ली बऱ्याच जणांना अनेक कारणांमुळे असंतुलित आहार, ताण, प्रदूषण, केसांची योग्य निगा न राखणे यामुळे केस गळतीला सामोरे जाव लागत. त्यामुळे आज आपण दाट, चमकदार केस करण्यासाठी घरच्या घरी शाम्पू तयार करूया.

घरच्या घरी शाम्पू तयार करण्याची कृती सुकवलेले रिठे, आवळे आणि शिकेकाई हे तीन मुख्य घटक हर्बल शाम्पू तयार करण्यासाठी गरजेचे आहे. हे सर्व घटक १ – १ वाटी घ्यावे. हर्बल शाम्पू तयार करण्यासाठी सुकवलेले रिठे, आवळे, शिकेकाई, ब्राम्ही, मेथीचे दाणे प्रत्येकी एक वाटी एकत्र करावेत.

हे सगळे पदार्थ एकत्र करून त्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवाव. मऊ झालेले हे पदार्थ कूच करून घ्यावे. त्यानंतर या मध्ये कडुलिंबाची, जास्वंदीची आणि कडीपत्ता घालून मिश्रण उकळून घ्यावे. हे मिश्रण उकळून जाळ्यावर गळून घ्यावेत. आंघोळीच्या आधी हा शाम्पू केसांच्या मुळांना मसाज करून लावावे. गरम पाण्याने केस धुणे टाळावे. या शाम्पू ने फेस तयार होणार नाही परंतु केस स्वच्छ होतील.

महत्वाच्या बातम्या