स्क्रब वापरा आणि त्वचा बनवा हेल्दी

त्वचेची काळजी घेणे स्त्रियांप्रमाणेच पुरुषांसाठीही आवश्यक आहे. पण रोजच्या धावपळीत आपल्याकडून त्वचेला क्लिनजिंग, टोनिंग, मॉईश्चरायझिंग करायला वेळच मिळत नाही किंबहुना असं काही असतं आपल्यापैकी कित्येकांना ठाऊकही नसेल. तुमच्या या समस्यवर उपाय म्हणजे खाली आम्ही दिलेले स्क्रब वापरून तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेऊ शकता…
  •  _*केळी स्क्रब*_ – दोन पिकलेली केळी कुस्करून त्यात पीठीसाखर टाका. पीठीसाखरेने स्क्रब खडबडीत होईल. यात एक चमचा मध टाका. हा पल्प 5 मिनिटे चेहऱ्यावर लावून चेहरा धुवून घ्या.
  •  _*लिंबू स्क्रब*_ – हात व पायांसाठी हे स्क्रब उत्तम आहे. हा स्क्रब बनवण्यासाठी दोन तुकडे केलेले एक लिंबू घ्या. एक तुकडा पिठीसाखरेत बुडवून नंतर त्या तुकड्याने हात व पायांना मसाज करा. 5 ते 7 मिनिटे मसाज केल्यावर कोमट पाण्याने हातपाय धुवून घ्या.
  •  _*दही व पपई स्क्रब*_ – हा स्क्रब बनवण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. ती चांगली कुस्करून घ्या. नंतर त्यात 2 चमचे घट्ट दही घाला. 4 थेंब लिंबाचा रस व 1 चमचा मध घाला. या पेस्टने 5 ते 7 मिनिटे मसाज करा.
  •  _*मध व संत्री स्क्रब*_ – प्रत्येकी 2 चमचे संत्र्याचा गर व ओट्स घ्या. हे मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट 5 मिनिटे वर्तुळाकार दिशेने आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
  •  _*ओट्स व टोमॅटो स्क्रब*_ – यासाठी तुम्हाला ओट्स, पीठीसाखर व पिकलेला टोमॅटो लागेल. टोमॅटोचे 2 मोठे काप करा. त्यात बारीक केलेले ओट्स व साखर घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर घासून 3 ते 4 मिनिटांनी चेहरा धुवा.
  •  _*अशी बनवा होममेड टूथपेस्ट…*_
आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात दात साफ करण्याने होते. दात साफ करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे केमिकल असलेल्या टूथपेस्ट मिळतात. या टूथपेस्टमुळे दात स्वच्छ होत असले तरी दात मजबूत होण्याऐवजी अधिकच कमजोर होतात. यावर उपाय म्हणून तुम्ही आपल्या घरच्या घरी टूथपेस्ट बनवू शकता. यामुळे कुठलेही नुकसान न होता दात चमकदार बनतील. यामुळे दाढ मजबूत होते….
_*साहित्य*_ : खोबरेल तेल – 2 चमचे, खाण्याचा सोडा – 2 चमचे, हळद – 1 चमचा, पुदिन्याच्या पानांचा रस – 10 ते 15 थेंब (पेपरमिंट एक्स्ट्रॅक्ट)
_*कृती*_ : सर्वप्रथम एका भांड्यात खोबरेल तेल व बेकिंग सोडा घेऊन चांगले मिसळा. यामध्ये पेपरमिंट एक्स्ट्रॅक्ट व हळद मिसळवून एकत्र करा. हे मिश्रण चांगले फेटून त्याची क्रीम बनवा. एका डब्यात ही क्रीम ठेवून दररोज वापरा.