औरंगाबादेत बेघर, दिव्यांगांच्या लसीकरणास गती, दोन दिवसात ‘एवढ्या’ जणांचे लसीकरण

vaccine

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधासाठी शहरातील बेघर, भिकारी, निराश्रित लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम राबवण्यासाठी पालिकेची पथके तयार करण्यात आली आहेत. शहरातील नऊ आरोग्य केंद्रावर हि मोहिम सुरु आहे. ७ जून ते १२ जूनपर्यंत हि मोहिम सुरु राहणार आहे. गेल्या दोन दिवसात २६७ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.

गतवर्षी कोरोनावर ठोस औषध उपलब्ध नव्हते. पण आता लस उपलब्ध झाल्याने जास्तीत जास्त लसीकरण करून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला जाऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. कोरोना लसीकरण करताना शासन निर्देशांनुसार आधार कार्डचा क्रमांक देणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील बेघर व्यक्ती, भिकारी, रस्त्याच्या बाजूने दुकाने थाटून व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसते.

त्यामुळे लसीकरणापासून ते सुटण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेत पालिका प्रशासनाने सोमवारपासून अशा व्यक्तींच्या लसीकरणाची सुरु केले आहे. सोमवारी (दि.७) पहिल्याच दिवशी १०४ दिव्यांग, १८ बेघरांचे लसीकरण करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी ८६ दिव्यांग, ३८ केअर टेकर, बेघर २१ असे एकुण १४५ जणांचे लसीकरण करण्यात आले. दोन दिवसात एकुण २६७ जणांचे लसीकरण करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP