भारताच्या कठोर भूमिकेमुळे सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी झाली कमी

टीम महाराष्ट्र देशा : गृहमंत्रालयाने आज दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. यावर्षी पहिल्या सहा महिन्यात तब्बल 43 टक्क्यांनी घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच दहशतवादी हल्ले आणि स्थानीय लोकांचं दहशतवादाकडं झुकण्याचं प्रमाण देखील कमी झाल्याच आकडेवारीमध्ये दिसत आहे. तर आतापर्यंत 22 टक्के जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आल आहे.

गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या लष्करी कारवायांमुळे घुसखोरीचे प्रमाण घटले आहे. तर पाकिस्तानातील दहशतवादी मुखिया आणि आयएसआयचे धाबे दणाणले आहेत. तर पाकिस्तानातून येणाऱ्या एकाही दहशतवाद्याला सोडू नका. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जावे. काश्मीरच्या मुद्दयावर भारत कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिल्याचे अधिकाऱ्याने दिले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभा निवडणुका आणि देशाच्या सीमेवर होणाऱ्या गोळीबाराचा संबंध जोडत एक ट्विट केले होते.जेंव्हा पासून निवडणुका संपल्या आहेत तेंव्हा पासून सीमेवरील गोळीबाराच्या बातम्या पण बंद झाल्या आहेत, असे ट्विट केले होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला गृह मंत्रालयाचे उत्तर मिळाले आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दहशतवादी घटनांमध्ये 28 टक्के तर स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीमध्ये 40 टक्क्यांनी घट झाली आहे.