नक्षलवाद्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, गृहमंत्री वळसे पाटील म्हणतात…

dilip walase patil

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्यानंतर आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एक पत्रक काढून मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधातील आहे आणि व्यवस्थेच्या विरोधात जी लोकं काम करतात त्यांनी अन्य लोकांना तुम्ही आमच्यात या, संघर्ष करा असे सांगणे म्हणजे एक प्रकारे देशाच्या व्यवस्थेला आव्हान देण्यासारखेच आहे किंवा धोका निर्माण करण्यासारखंच आहे. त्यामुळे त्यांच्या आव्हानाचा फार विचार करण्याची गरज नाही. बाकी आपल्या लोकशाही राज्यात राज्यघटना, सरकार, न्यायालय या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवले जात आहेत. असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP