किरीट सोमय्या हे उपद्रवी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : वाधवान प्रकरणातील अधिकारी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांची चौकशी अतिरिक्त सचिव मनोज सौनिक करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी एका व्हिडीओद्वारे याबाबतची माहिती दिली. तसेच त्यांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका देखील केली.

वाधवान प्रकरणानंतर विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वाधवान प्रकरणात पवार परिवारावर घणाघात केला आहे. शरद पवार आणि वाधवान कुटुंबियांचे घरगुती संबंध असल्याचं जगजाहीर आहे, असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे. पवारांच्या पाठिंब्याशिवाय गृह सचिवांकडून विशेष परवानगी पत्र मिळणं अशक्य आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

तसेच याबाबत चौकशी लावून गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.  यावर अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, किरीट सोमय्या हे उपद्रवी प्रवृत्तीचे नेते आहेत.

कोणत्याही IPS अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला असतो. त्यामुळे भाजप नेत्यांना माझी विनंती आहे की, केंद्र सरकारला सांगून अमिताभ गुप्ता यांच्यावर बडतर्फची कारवाई करावी, असा टोला देशमुख यांनी लगावला.

दरम्यान राज्यातून कोणालाही बाहेर जायचे असेल किंवा जिल्हा बदलायचा असेल तर त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना होती, याची कल्पना अमिताभ गुप्ता यांना होती. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या अधिकारात वाधवान कुटुंबीयांना परवानगी दिली. ती देत असताना त्यात त्यांनी ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत असा उल्लेख केला. अधिकाराचा गैरफायदा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

हेही पहा –