१५ ऑगस्टला अमित शहा फडकवणार काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा !

टीम महाराष्ट्र देशा: जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लाल १५ ऑगस्टला लाल चौकात तिरंगा फडकवणार असल्याचं वृत्त आहे. गुरुवारी शहा हे श्रीनगरला भेट देणार आहेत, त्यामुळे घाटीमधील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे स्वतः काश्मीरमध्ये असून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० संपवत मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, तसेच काश्मीर आणि लडाखचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशांत करण्यात आले आहे. सरकारकडून कलम ३७० रद्द केले जात असताना संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आजही हजारो सैनिक काश्मीरमध्ये तैनात आहेत, तर माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवणं अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय घटना ठरणार आहे. तर जम्मू काश्मीरला भारताचा संपूर्ण भाग बनवल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घेण्यासाठी मोदी-शहा मास्टरप्लॅन आखत असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या