सावखेड्यातील शाळेभोवती तळे साचल्याने मुलांवर सुटी घेण्याची पाळी

औरंगाबाद : सांगसांग भोलानाथ पाऊस पडेल का..! शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का..? या गाण्यातील कल्पनेप्रमाणे शाळेभोवती तळे साचल्याने मुलांना सोमवारी सुटी घेण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर आली. शेंदुरवाडयानजीक सावखेड्यातील नेहरू विद्यालयाची ही अवस्था झाली आहे. शाळेतील तळयामुळे शाळेशेजारचे नागदेवतेचे मंदिरही पाण्याखाली गेले आहे. पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची रचना शाळा व्यवस्थापनाने केली असती तर आज हेच पाणी साचून शाळेभोवती या पावसाच्या पाण्याचे डबके साचले नसते, असे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे.शाळेतून जाणारे पाणी कर्मचा-यांनी दुस-या मार्गाने काढून दिल्याने शाळेच्या परिसरातील काही घरात आणि शेतात पाणी शिरले आणि यांच्या रागालाही शाळा व्यवस्थापना तोंड दयावे लागले.