अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

टीम महाराष्ट्र देशा : पुणे आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कात्रज तलाव साखळीतील तीनही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतीपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील पुराच्या पाण्याने वेधले. सुमारे आठ-दहा फुट पाणी वाहत होते.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये.

Loading...

याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवार दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित केली आहे.

तसेच पुणे शहराच्या दक्षिण भागामध्ये बुधवारी रात्री पाच – सहा तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, सिहगड रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यामुळे असंख्य गाड्यांचे नुकसान झाले आहे. जनता वसाहत परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?