ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी उद्या स्थानिक सुट्टी

जळगाव-ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. हा दिवस कार्यालयीन कामाकाजाचा दिवस असल्याने या दिवशी सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या क्षेत्रात मतदानाकरिता स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.जिल्हयात २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी २७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागातंर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने यांना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य होणार नसेल तर मतदान क्षेत्रातील मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे