fbpx

प्रकाश आंबेडकरांनी केली प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची होळी

prakash aambedkar evm

पुणे: भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिकात्मक ईव्हीएमची होळी केली. ईव्हीएम मशीनचा होणारा गैरवापर, आणि अद्यापही भटक्या विमुक्त जमातीतील अनेकांना मतदान करण्याचा अधिकार नाही याचा निषेध व्यक्त करीत प्रतिकात्मक एव्हीम मशीनचे दहन करण्यात आले.

भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्रच्या ७व्या पंचवार्षिक अधिवेशनाच्या निमित्त पुण्यात सत्ता संपादनाच्या लढाईसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यावेळी आंबेडकर यांच्या हस्ते ईव्हीएम मशीनच होळी करण्यात आली. कार्यक्रमाचे मार्गदर्शक छत्रपती शाहू महाराज आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण माने देखील उपस्थित होते.

2 Comments

Click here to post a comment