ईव्हीएम हटाव देश बचाव; पुण्यात ईव्हीएमची होळी

पुणे : सध्या देशभरात विरोधक ईव्हीएम मशिन च्या मुद्द्यावरून सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आवाज उठवत आहेत. आज पुण्यात सर्वपक्षीय पुणेकर कृती समितीच्या वतीने ईव्हीएम विरोधात पुणे महापालिका आवरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा देत ईव्हीएम मशिनची प्रातिनिधिक स्वरुपात होळी करण्यात आली.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात तसेच भंडारा-गोंदिया या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं. मात्र मतदानाच्या वेळेस अनेक ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय बनली विरोधकांनी या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली होती. आज पुण्यात भाजप वगळता जवळपास सर्व पक्षीयांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, हे प्रकरण ताज असतानाच, आज पालघर मधील ईव्हीएम मशिन्स बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रियेत झालेल्या गोंधळला मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांना जबाबदार धरून, त्यांच्या विरोधात पुण्यात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

पत्रकार राजेंद्र सोनार यांनी ओम प्रकाश रावत यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.डी.मेश्राम यांच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. लोकसभा मतदानामध्ये झालेल्या गोंधळामुळे समाजातील शांतता नष्ट होवून अशांतता निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण ही जनहित याचिका दाखल केल्याचं त्यांनी सांगितले.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...