देशभरात होळीचा उत्साह ; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा !

टीम महाराष्ट्र देशा : राज्यासह देशभरात सध्या होळीचा उत्साह आहे. आज धूळवडीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी आज धूळवड खेळली जाते. रंगांची उधळण केली जाते. कोकणात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात 8 ते 15 दिवसांचा शिमगा साजरा केला जातो.

होळीच्या पवित्र सणाच्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा! असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत