मुंबई : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आशिया चषक हॉकी २०२२ (Asia Cup 2022 ) स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत आज दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने आले होते. या दोन्ही संघांमधील सामना १-१ असा बरोबरीत सुटला आहे. भारतीय संघाचा एकमेव गोल कार्ती सेल्वमने सामन्याच्या नवव्या मिनिटाला केला. सामन्याच्या ५९व्या मिनिटाला अब्दुल राणाने पाकिस्तानकडून गोल केला. आता भारताचा पूल-अ मधील दुसरा सामना मंगळवारी जपानशी होणार आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारत, जपान, पाकिस्तान आणि यजमान इंडोनेशियाला पूल-अ मध्ये, तर मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांगलादेशला पूल-बीमध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. संघाचे नेतृत्व अनुभवी बिरेंदर लाक्राकडे आहे, तर सरदार सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. २०१७ मध्ये आशिया कपचा शेवटचा हंगाम खेळला गेला होता, जेव्हा भारतीय संघाने मलेशियाचा पराभव करून तिसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला.
Full-time! India made every effort in their first match against Pakistan, but they were tied at the end of Quarter 4. Looking forward to India's more energetic approach.
🇮🇳 1-1 🇵🇰#IndiakaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #INDvsPAK @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/1A2P3hfncB— Hockey India (@TheHockeyIndia) May 23, 2022
भारतीय संघ : पंकज कुमार रजक, सूरज कारकेरा, यशदीप सिवाच, अभिषेक लाक्रा, बिरेंदर लाक्रा (कर्णधार), मनजीत, दीपसन तिर्की, विष्णुकांत सिंग, राज कुमार पाल, मारिसवरेन शक्तीवेल, शेष गौडा बीएम, सिमरनजीत सिंग, पवन राजभर, अबरन सुदेव, एसव्ही सुनील (उपकर्णधार), उत्तम सिंग, एस. कार्ती, नीलम संजीव जेस.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<