शिवरायांबद्दल अपशब्द: खुर्चीही गेली. .पक्षाने हाकलेले. . शेवटी हाती पडल्या बेड्या

Shripad Chhindam jpg

संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणे एखाद्याला किती महागात पडू शकते याच मोठ उदाहरण म्हणजे अहमदनगर महापालिकेचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम. सकाळी उठताना एका महापालिकेच्या उपमहापौर पदासारखे संविधानिक पद भूषवणाऱ्या छिंदमच्या हातात रात्र होताहोता बेड्या पडल्या. तर भाजपने प्रकरण अंगाशी येत आहे हे दिसल्यावर छिंदमला पक्षातून निलंबित करत उपमहापौर पदावरून हकालपट्टी केली. मात्र दिवसभरात नेमक अस काय काय घडल ज्यामुळे सत्तेच्या सारीपाटावर स्वताला राजा म्हणवून घेणाऱ्या छिंदमचा रंक झाला हे पाहूयात.

नेमक काय घडल
श्रीपाद छिंदम हाअहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

भाजपने केले निलंबित खुर्ची ही गमवावी लागली
श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो व्हायरल होताच नगर शहरात याचे पडसाद उमटले. भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच छिंदम यांची भारतीय जनता पार्टि व उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

श्रीपाद छिंदमचे कार्यालय फोडले
उपमहापौर श्रीपाद छिंदम यानी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त जमावाने त्याच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली. तसेच जमावाचा रोष पाहता नगरमधील भाजप नेत्यांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आल.

पोलिसांनी ठोकल्या बेड्या
उद्दाम आणि मस्तवाल माजी उपमहापौर छिंदम याला हे सर्व प्रकरण चांगलेच महागात पडले. दुपार होताहोता राज्यभरातून शिवप्रेमींकडून सोशल मिडीया तसेच रस्त्यावर तीव्र विरोध दर्शवण्यात येवू लागला. शेवटी एक व्हिडियो सोशल मिडीयावर टाकत त्याने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली. मात्र शेवटी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी छिंदमला बेड्या ठोकल्या.